जागतिक आंबेडकरवादी साहित्यमहामंडळ द्वारे देण्यात येणारा राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आचार्य सुधीर वानखेडे यांना जाहीर झाला आहे.
सुधीर वानखडे हे गेल्या 30 वर्षापासून सद् धम्म प्रचार केंद्र महाराष्ट्र प्रदेशच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माचे शिकवणीचे काम करत आहे. या कामांमध्ये नेहमी त्यांचं आजपर्यंत सातत्य सुरूच आहे याद्वारे ते अनेक शिबिरे व्याख्याने धम्म परिषदा अशा विविध क्षेत्रामध्ये ते काम करत आहे सोबतच प्रत्येक विहारांमध्ये दर रविवारी जाऊन त्या ठिकाणी प्रबोधनात्मक व धार्मिक चळवळीमध्ये त्यांचे काम सुरू राहते याच कामाची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आचार्य सुधीर वानखडे यांना हा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक धम्म बांधवांनी त्यांना शुभेच्छा पाठविल्या व संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे