जेष्ठ भाजप नेते अरूणभाऊ अडसड यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहिर

0
320
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

 श्री धनुजी महाकाळे ग्रामिण व शहरी विकास संस्था हिंगणघाट जिल्हा नागपूर तर्फे भाजपचे जेष्ठ नेते मा. आमदार, विदर्भ विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, अखिल भारतीय शेतकरी मोर्चाचे माजी सरचिटणिस अरूणभाऊ अडसड यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर घाटे व सचिव किशोर करांगळे यांनी दिली.

२१ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेतकरी, विकास आणि सामाजिक क्षेत्रात व्रतस्थपणे कार्यकरणाऱ्या महानुभावांना हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शेतकरी व सामाजिक क्षेत्रात अरूणभाऊ अडसड यांनी उल्लेखनिय कार्य केले असून शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती आंदोलन, खामगाव ते नागपूर पदयात्रा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ निर्मितीसाठी आंदोलन, बेरोजगारांच्या समस्येकरीता प्रचंड मोर्चे तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणुन त्यांनी विदर्भ विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. भाजपा शिवसेना युतिच्या काळात अरूणभाऊ अडसड हे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. गडचिरोली ते बुलढाणा, वाशिम जिल्हयातील शेवटच्या टोकापर्यंत अनेक विकास कामे त्यांनी केली. दरवर्षि ५० कोटी रूपये विकास कामांवर खर्च केले. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा निधी कसा वापरावा याचा वस्तुपाठ त्यांनी घालुन दिला. तसेच कवी व लेखक म्हणुन त्यांचा “आक्रोश” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. प्रा. मधुकर घाटे, किशोर करांगळे, प्रा. भानुदास महाकाळे, पुरषोत्तम कावठे, समाजसेवी नितीन देशमुख, विलास कदम, डॉ. शांतीदास लुंगे यांच्या निवड समितीने अडसड यांची निवड केली आहे. अमरावती येथे आयोजीत कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

veer nayak

Google Ad