चांदुर रेल्वे : नमो उद्यानावरून राजकीय वाद पेटला

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे येथे प्रस्तावित नमो उद्यान या महत्त्वाच्या विकासात्मक विषयावर नगरपरिषदेत जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. या विषयावर चर्चा सुरू असताना नगराध्यक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभा सोडल्याने वातावरण तापले.

नमो उद्यान करण्याकरिता भारतीय जनता पक्षाच्या बारा नगरसेवकांनी जागा निश्चित करून आपले मत नोंदवले, असे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील या विषयावर एकमत न झाल्याने वाद अधिकच वाढला.

नगरपरिषद उपाध्यक्ष बच्चू वानरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की,

“विकासात्मक कामांना विरोध करणाऱ्या नगराध्यक्षांसह काँग्रेस व वंचित आघाडीच्या सदस्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.”

तसेच, गटनेते पप्पू भालेराव यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटले की,

“संताबाई यादव नगर येथे नमो उद्यान व्हावे, ही भाजपच्या बाराही नगरसेवकांची मागणी आहे. मात्र, नगराध्यक्षांसोबत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांनी विरोध करत सभा त्याग केला. यावरून त्यांच्या विकासाबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.”

या प्रकरणामुळे चांदुर रेल्वे नगरपरिषदेत राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांमध्येही या विषयावर चर्चा सुरू असून, नमो उद्यानाचा निर्णय पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

veer nayak

Google Ad