दर्यापूर ते शिरजदा ही बस खैरी या गावा पर्यंत नियमीत सुरू करा  युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दर्यापूर – दर्यापूर आगार मधुन सकाळी 7, 10:30, दु. 12 व सायंकाळी 6 वा. ची दर्यापूर गायवाडी कळाशी मार्गे खैरी स्टॉप वर जाणारी गाडी ही शिरजदा पर्यंत पुढे खैरी गावात आत मधून जात नाही त्या कारणाने विदयार्थी,सामान्य जनता,वयोवृध्द इत्यादींना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने खैरी येथे बस ची व्यवस्था नियमीत करण्यात यावी जेणे करून शालेय विद्यार्थी, महिला वर्ग व प्रौढांना सोयीचे होईल करीता आपण खैरी गावा पर्यंत बस ची व्यवस्था करण्यात यावी असे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वाखाली बस आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले व बस सुरू न केल्यास युवासेना स्टाईलने आंदोलन करण्यास येईल होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला त्यावर बस आगार मधील संबंधित अधिकारी यांनी उद्याच खैरी या गावात जाऊन गावाचा सर्वेक्षण करून अनियमित असलेली बस सेवा सुरू करून खैरी फाट्यापासून गावात आत मध्ये जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, सतीश जामणीक, योगेश बुंदे, अभिजीत मानकर, प्रशांत धर्माळे, विजय डवंगे, सागर वडतकर, रोहित बायस्कर, पंकज राणे, निलेश पारडे, अनिकेत उन्नतकर तसेच शाळकरी विद्यार्थिनी उपस्थित होत्या

veer nayak

Google Ad