श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे गुढीपाडवा-रामनवमी महोत्सवाची भव्य सत्कार सोहळासह महाप्रसाद

0
45
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे गुढीपाडवा-रामनवमी महोत्सवाची भव्य सत्कार सोहळासह महाप्रसादाने सांगता गुढीपाडव्याला झेंडे चढतांना २ तासात एकाच वेळी ७० ते ७५ क्विंटल कापूर जळणारी कापूराची यात्रा हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ; अवधूत नाम प्रवचनकार,अवधूत भजन मंडळ, यात्रा उत्सव समित्या,दैनंदिन भजनकार, स्वयंसेवक, सेवाधारींचा भव्य सत्कार सोहळा

चांदूर रेल्वे :- महाराष्ट्रातील विदर्भात प्रसिद्ध लाखो लोकांचे जागृत आणि स्वयं श्रद्धास्थान असलेले अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २९/३/२०२५ ते ७/४/२०२५ पर्यंत गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव संस्थानचे विश्वस्त मंडळ आणि लाखों भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आणि भव्य महाप्रसादाचे आयोजनाने संपन्न झाला.

गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थानचे विश्वस्त चरणदास नामदेवराव कांडलकर रा. सावंगा (विठोबा) हे नवीन वस्त्र परिधान करून यांचे शुभ हस्ते महाराजांच्या बोहलीची विधीवत पूजन तसेच दोन्ही झेंड्याची पूजा करून नवीन खोळ(कापड) घालण्याकरिता या दोन्ही झेंड्याला पायाचा स्पर्श न लागू देता दोरांच्या सहाय्याने झेंडे चढविण्याचा चित्तथरारक नेत्रदीप कार्यक्रम सुरू असतांना प्रत्येक भाविक श्रध्देने कापूर जाळून हा सुख सोहळा पाहण्यासाठी लाखों भाविक उपस्थित होते, परंतु यावेळी रामनवमीला ही चंदन उटी व रमणा कार्यक्रमास भाविकांची अलोट गर्दी यावेळी येथे पाहावयास मिळाली.

यात्रा महोत्सवात भाविकांची गर्दी बघता शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त सोबत संस्थानने स्वयंसेवक व सेवाधारी यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे यात्रेत स्वयंशिस्त दिसून आली. गर्दीच्या दृष्टीने संस्थानच्या स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.संस्थानचे वतीने भाविकांसाठी सावली दर्शन नेट मंडप,थंड पाणी, चप्पल स्टॅण्ड, प्रवेश मार्गावर दान साहित्य करिता मंडप, मांड आणि भाविक बसण्यासाठी भव्य मंडप, दर्शन रॅलिंग,झेंडे चढवितांना बोहली पुढे दर्शन, अवधूत भजन मंडळांना झेंड्यासमोर आरती करिता प्रवेश, यात्रेत पाणी टॅंकर,यात्रा परिसर शेताची ट्रक्टरद्वारे साफसफाई, भाविकांसाठी अन्नदान इ. व्यवस्था करण्यात आली होती. 

 रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चैत्र मांडीच्या वाढव्यास अर्जानी सुरवात करण्यात आली, तर सकाळी ७.०० वाजता प. पु. कृष्णाजी महाराज यांचा भव्य रमना आणि पालखी सावंगा नगरीत फिरली. यावेळी ग्रामस्थांनी महाराजांच्या रमना व पालखीचे स्वागत केले तत्पूर्वी संपूर्ण गावात साफ सफाई करून अंगणात रांगोळी टाकून महाराजांच्या रमनाचे स्वागत केले.

नंतर अवधूत नाम प्रचारक भाऊदास नांदणे महाराज (वासणी खुर्द) यांनी महाराजांच्या गाथ्या मधील ओवी क्र.७ “सावंगपुरचे राजे विठोबा करा हो बादशाही” वर प्रवचन दिले, यानंतर अवधूत नाम प्रवचनकार,अवधूत भजन मंडळ,यात्रा उत्सव समित्या,दैनंदिन भजनकार,स्वयंसेवक आणि सेवाधारी यांचा शेला श्रीफळ आणि संस्थानचे सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रभाकर भगोले हे अध्यक्षस्थानी होते,प्रमुख अतिथी ॲड.अनुप जयस्वाल (राज्य कोर कमेटी पदाधिकारी,महाराष्ट्र मंदिर महासंघ),निलेश टवलारे (जिल्हा समन्वयक, हिंदू जनजागृती समिती),कैलास पनपालीया (जिल्हा संयोजक,मंदिर महासंघ), सचिन वैद्य (जिल्हा सह समन्वयक,हिंदू जनजागृती समिती) यांची उपस्थिती होती.

संस्थानने यावेळी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील संपूर्ण ग्रामस्थांसोबतच यात्रेकरू भाविकांनी ही मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला. 

सर्व भाविक- भक्तांनी नित्य नियमाने वर्षभर सुरु असलेल्या संस्थानच्या विविध कार्यक्रमाकरिता तन-मन-धनाने सहकार्य करावे अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, लक्ष्मण राठोड वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद दुधे, प्रास्ताविक संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, आभार प्रदर्शन सचिव अशोक सोनवाल यांनी केले.

veer nayak

Google Ad