श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “श्रावण मास मांड (अखंड-भजन) शुभारंभ” आणि”अमावस्या” निमित्त “चंदनउटी उत्सव”

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

            अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २४/७/२०२५ गुरुवारला सकाळी ५.०० वाजता श्रावण मास मांडीची सुरुवात लहान मंदिरात ढाल बसवून मुख्य मंदिरात महाराजांच्या गणाने विश्वस्त मंडळ आणि भाविक भक्त यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे आणि दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने “अमावस्या” निमित्त “चंदन ऊटी उत्सव” आयोजित करण्यात आलेला आहे.

                  या कार्यक्रमाकरिता बाहेर गावावरून आलेल्या भक्तांना संस्थानचे वतीने अन्नदान समितीच्या नियंत्रणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

          श्रावण मास मांडीमध्ये बाहेरगावातील अवधूत भजन मंडळांचा दैनंदिन सहभाग राहणार आहे. त्याकरिता संस्थानच्या वतीने दि. २४/७/२०२५ ते दि.२४/८/२०२५ या कालावधीचे भजन पाळीचे नियोजन तयार करण्यात आले आहेत.या सहभागी अवधूत भजन मंडळांकरिता संस्थानच्या वतीने चहा, नाश्ता आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच श्रीफळ देऊन मंडळांचा सत्कार आणि नवीन सहभागी मंडळांना महाराजांची गाथा भेट म्हणून देण्यात येणार आहे.

             बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या वतीने दैनंदिन दुपारी १२ ते १.३० आणि रात्री ८ ते ९.३० या वेळात प्रसाद (भोजन)चे वितरित करण्यात येत आहे. याकरिता संस्थानचे प्रसादालयामध्ये प्रसाद देणगी पावती घेऊन भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा.तसेच संस्थानमध्ये इच्छूक अन्नदान दात्यांनी अन्नदान देणगी देवून अन्नदान करता येईल,या करिता संस्थानशी संपर्क साधावा.

          तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर,प्रविण कुकडकर,लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad