अमावस्या निमित्त “चंदनउटी व रमणा” आणि गुढीपाडवा निमित्त “झेंडे चढविण्याचा सोहळा”
अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २९/३/२०२५ शनिवार रोजी संस्थानचे वतीने सकाळी ७ ते १० वा.मंदिर परिसर आणि ग्राम परिसर साफसफाई, दुपारी ५ वा.अमावस्या निमित्त चंदनउटी आणि रमणा,दि.३०/३/२०२५ रविवार रोजी दुपारी ५ वा.गुढीपाडवा निमित्त महाराजांचे “झेंडे चढविण्याचा भव्य दिव्य नेत्रदीप सोहळा” संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर,सावंगा (विठोबा) यांचे शुभ हस्ते आणि विश्वस्त मंडळाचे उपस्थित लाखो भाविकांचे साक्षीत संपन्न होत आहे.
दि.३१/३/२०२५ ते दि.५/४/२०२५ या कालावधीत संस्थानचे वतीने विविध धार्मिक कार्यक्रम अंतर्गत दैनंदिन दिवसरात्र अवधूत भजन,रात्री रमणा पालखी रथ आणि महाराजांचे ओवीवर प्रवचन कार्यक्रम तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.दि.६/४/२०२५ रविवार रोजी दुपारी ४ वा.रामनवमी निमित्त चंदनउटी आणि रमणा, रात्री ८वा. प्रवचन कार्यक्रम दि.७/४/२०२५ सोमवार रोजी सकाळी ६.३० वा. चैत्र मास मांडीच्या वाढव्यास अर्जांनी प्रारंभ,सकाळी ७ ते ९ वा.मुख्य मंदिरातून लहान मंदिर,संपूर्ण गावातून भजन, रमणा, पालखी,रथ सह भव्य शोभायात्रा तसेच ढालीचा आणि मांड वाढव्याचा कार्यक्रम सकाळी ९ ते १० वा. सत्कार समारंभ सकाळी १० ते १२ वा.मांडीचे वाढव्याचा प्रवचन कार्यक्रम दुपारी १ वा.भाविकांकरिता भव्य महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. .
याही वर्षी संस्थानचे वतीने भाविकांकरिता सावलीसाठी दर्शन नेट मंडप,चप्पल स्टॅण्ड,झेंडे चढतांना बोहली समोरुन सतत दर्शन,यात्रेत टॅंकर द्वारे पाणी पुरवठा व्यवस्था,भाविकांकडून दान साहित्य जमा करण्यासाठी संस्थानचे गावात येणाऱ्या सर्व मार्गावर मंडप व्यवस्था,भाविक भक्त आणि मांडींना बसण्याकरिता भव्य मंडप व्यवस्था, स्वयंसेवक निवास व्यवस्था तसेच भक्त निवास हाॅलमध्ये भाविकांकरिता मसाले-भात प्रसाद व्यवस्था करण्यात येत आहे.
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड,अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर,लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.