बालकला अकादमी व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने खासदार चषक विदर्भस्तरीय आंतरशालेय विद्यार्थी देशभक्ती समूहगान स्पर्धेचे आयोजन दिनांक 4/ 8 /2025 व 6/8/2025 ला कविवर्य सुरेश भट सभागृह ,नागपूर येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजन दोन गटात -‘गट अ’ वर्ग 1 ते 5 व ‘गट ब’ वर्ग 6 ते 10 करण्यात आले होते. गट अ ची प्राथमिक फेरी दिनांक 4 /8/ 2025 रोजी झाली तर गट ब ची प्राथमिक फेरी 6/ 8/2025 रोजी पार पडली .गट ब साठी विदर्भातील ५१ शाळेने उपस्थिती दर्शविली होती. गट ब च्या प्राथमिक फेरीत धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयातील 13 विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या . विद्यार्थिनींनी “निर्माणों के पावन युग में” व “लडकियां हम हिंदुस्तान की” या गीतांची प्रस्तुती केली.
यावेळी बालकला अकादमीच्या अध्यक्षा सौ. मधुरा गडकरी व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. सीमा फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी सहभागी विद्यार्थिनीचे कौतुक केले.या उपक्रमात सहभागासाठी विद्यालयच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तर सौ.अदिती पाठक व श्री.वडगीरे यांनी गीतांची निवड व विद्यार्थिनींच्या सरावासाठी विशेष मेहनत घेतली. श्री. भुषणजी कांडलकर यांचे याप्रसंगी बहुमोल सहकार्य लाभले . आंतरशालेय देशभक्ती समूहगान स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थिनी कु. एकता लोंदे, कु. मान्यता गाडेकर, कु. आस्था चवरे, कु. खुशी खराबे, कु. वेदिका खराबे, कु. गार्गी परचाके, कु. सुहानी स्थूल, कु,भूमिका पनपालिया, कु. श्रुती बोदिले, कु. पूर्वी सावंत ,कु. श्रावणी गांडोळे, कु. मृणाल ठाकूर, कु. वैष्णवी निखाडे सोबत शाळेतील शिक्षिका सौ.नम्रता पोतदार व सौ. स्नेहल जुनघरे उपस्थितीत होत्या. वाद्यवृंद संचामध्ये श्री.बंडुजी जुनघरे व श्री. अरविंद पायघन यांनी विशेष साथ दिली. सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थिनींना प्रमाणपत्र प्राप्त झाले. सहभागी विद्यार्थिनींचे
सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले .शेवटची फेरी शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025रोजी स्मृती भवन रेशीमबाग येथे होईल.