सरत्या वर्षात काही गोष्टी राहून गेल्या पण त्या पूर्ण नक्की करायच्या या ध्येयाने प्रेरित होऊन नववर्षात पदार्पण करायला हवं. येत्या वर्षात आपल्या समोर कित्येक ध्येय असावी. नवनवीन संकल्प करतांना आपण आपल्या डोळ्या समोर ठेवलेले ध्येय पूर्ण करतो आहोत ना… याचा विचार करायला हवा. येत्या वर्षात पूर्वीच्या चुका टाळायला हव्या. मागच्या वर्षाचा आलेख डोळ्यासमोर ठेवून नव्याने ध्येयपूर्तीसाठी नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे..
आज नूतनवर्षांभिनंदन – 2025 निमित्य से.फ.ला.हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा- अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर चित्र रेखाटन करून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.