समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे, स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाते..
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला. हायस्कूल,धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर सत्यशोधक – शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्ररेखाटन करून त्यांना कोटी कोटी वंदन केले आहे..