आर्वी : आगामी आर्वी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठीची हालचाल गतीमान झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाशी दीर्घकाळ जुळलेले, संघटनेत सक्रिय उमेदवार म्हणून सध्या स्नेहल शिंगाणेची चर्च्या हाेत आहे.
या कुटुंबातील सदस्यांनी गेली १५ वर्षे भाजपच्या संघटनात विविध पदांवर काम केलं आहे. घरातील ज्येष्ठ सदस्यांनी आर्वी शहर उपाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि सध्या जिल्हा उपाध्यक्ष या पदांवरून संघटन बळकट करण्याचं काम केलं आहे. त्याच कुटुंबातील दुसरे सदस्य सध्या आर्वी शहर भाजपचे महामंत्री म्हणून कार्यरत असून, शहरातील पक्षकार्यकर्त्यांना एकत्र आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
या घराण्यातील पुढील पिढीनेही पक्षकार्याची परंपरा पुढे नेत, संघटनेत सक्रियता दाखवली आहे. विशेषतः महिला कार्यकर्त्यांमध्ये आणि युवकांमध्ये या नेतृत्वामुळे नव्या उर्जेचं वातावरण निर्माण झालं आहे. पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा, शिस्त आणि लोकसंपर्काची कार्यशैली या कुटुंबाची वैशिष्ट्यं ठरली आहेत.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, “भाजपशी वर्षानुवर्षे जुळेलेले आणि संघटनेत सातत्याने आणि निस्वार्थपणे योगदान देणारं आहे या घरातील अध्यक्षपदासाठी उमेदवारी देतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
भाजपचे आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन हे कुटुंब पक्षातील समर्पित कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा पाठिंबा या घराण्याला मिळत असल्याचं पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे.
















