प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे
सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगरूळ येथे घडली आहे .मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी सुनील मारोतराव तिजारे वय वर्ष 45 हा शिदोडी मंगरूळ दस्तगीर शेत शिवारात त्याच्या शेतामध्ये शेतीचे काम करत असताना त्याला एका विषारी सापाने दंश केला . सुनील याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचाराकरिता आणण्यात आले. प्रथम उपचारा नंतर पुढील उपचाराकरिता अमरावती येथे पाठविण्यात आले परंतु चांदुर रेल्वे पुढे जात असताना मधातच रुग्णवाहिकेत सुनील ची प्राणज्योत मावळली. सुनील याला पत्नी आई-वडील व दोन मुले एवढा मोठा तुझा परिवार आहे. सुनील च्या मृत्यूने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.