श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयात शुभेच्छा व गुणगौरव समारंभ संपन्न

0
39
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित श्रीमती हिराबाई गोयंनका कन्या विद्यालयात मार्च 2024 च्या माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा गुणगौरव तर मार्च 2025 च्या परीक्षेस प्रविष्ट १०वी च्या विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ.शोभादेवी राठी यांच्या अध्यक्षतेखाली,धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.रमेशचंद्रजी चांडक व सहसचिव डॉ. असीतजी पसारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन,व स्व.श्री.श्रीनारायणजी अग्रवाल,स्व.श्री. लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या प्रतिमाचे पूजन झाले.प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता देशपांडे यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांचा आदर्श ठेवून माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2025 ला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहित करून त्यांनी ही घवघवीत यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या.तणाव न घेता , वेळेचे नियोजन करून,कोणताही गैरप्रकार अवलंब न करता सर्व विद्यार्थिंनिनी परीक्षेस सामोरे जावे. प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींचा गुणगौरव मार्च 2024 च्या शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी कु. श्रावणी संदीप मिर्चापूरे ९६.६०% द्वितीय क्रमांक प्राप्त, कु. ओजल बडवाईक ,९६.४०%कु. शर्वरी राऊत९६.४०%यांना धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विविध दात्यांकडून पारितोषिक प्राप्त झाले ,२०२४च्या शाळेच्या वार्षिक परीक्षेत वर्ग ५ते ९तील प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनिंना पारितोषिक प्रदान करण्यात आली, पहिल्या राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन मंगरूळ चव्हाळा येथील नाट्याविष्कार स्पर्धेत पारितोषिक प्राप्त नाट्यचमु सहभागी विद्यार्थिनिंना , नाट्य दिग्दर्शक श्री.वडगिरे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . शेजल बडवाईक वर्ग ९वी, हिने १०वीतील मोठ्या ताई, मैत्रीण सोबतच्या सहवास लाभल्यामुळे काय काय शिकलो ते सांगितले व १०वी च्यापरीक्षेत आपल्या मोठ्या ताई, मैत्रीण खूप छान यश मिळावं म्हणून खूप शुभेच्छा दिल्या.शाळेच्या वर्ग 10 इंद्रायणी मधून कु. युक्ती सुनील आंबटकर , वर्ग 10 पयोषणी मधून कु.रश्मी परिमल ,वर्ग 10 त्रिवेणी कु. मनस्वी ठाकरे ,कु.जानवी लोंदे या सर्व विद्यार्थिंनिनी आपल्या मनोगतात शाळेविषयीचे प्रेम, ५वी ते १०वी या ६ वर्षाच्या काळात शाळेचा पहिला दिवस ते १०वीचा आजचा शुभेच्छा समारंभ दिवस, शाळेतील रोजच्या आठवणी शाळेतील शिस्त,रोजचा परिपाठ, विविध कार्यक्रम सहभाग, उपक्रम ,चांगले संस्कार आमच्या वर झालेत.मुखाध्यापिका,सर्वच शिक्षकांनी विषयावर केलेलं मार्गदर्शन यामुळे आम्ही चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करू असे मनोगतात सांगितले.प्रमुख अतिथी ॲड.रमेशचंद्रजी चांडक यांनी शालांत परीक्षा 2025 ला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता पेपर कसा सोडवायचा यातील बारकावे सांगितले , त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शोभादेवी राठी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना वेळेचे महत्व, अभ्यासाचे नियोजनआणि ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शितल जोशी, पारितोषिक वितरण सोहळा वाचन कु . मनिषा कचवे,आभार प्रदर्शन कु. मोनाली चन्ने हिने केले.वर्ग९, वर्ग १०च्या विद्यार्थिनींनी अल्पोपहार देण्यात आला.शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर सहकारी वर्ग यांनी याचे नियोजन केले.

veer nayak

Google Ad