दि.10 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय व सामाजिक वनीकरण परिक्षेत्र धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग शैक्षणिक सहल चिखलदरा व कोलकास सेमाडोह व आमझरी या ठिकाणी नेण्यात आली . यामध्ये शाळेतील 40 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल माहिती व्हावी व त्यांचा भौगोलिक परिस्थितीची जाणीव व्हावी हा या सहली मागील उद्देश होता. या सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता देशपांडे, हरित सेना प्रभारी चंद्रशेखर वडगिरे , रवींद्र गिरी, राहुल पोतदार, मोनाली चन्ने तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र धामणगाव रेल्वे येथील वनरक्षक रोशन ठवकर व सोळंके यांच्या समवेत सहल सकाळी ठीक साडेसहा वाजता धामणगाव रेल्वे इथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने निघाली.सर्वात प्रथम कोलकास येथे पोचून निसर्गरम्य अशा वातावरणात जयश्री,चंपाकली,सुंदरकली या हत्ती विषयी माहिती जाणून घेतली व विद्यार्थिनी हत्ती सवारीचा आनंद घेतला.त्यानंतर असे म्हणला पर्यटन संकुलाला भेट देऊन निसर्गाच्या सानिध्यामध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आमझरी येथे विद्यार्थिनी एडवेंचर गेम मध्ये सहभागी झाल्या. चिखलदऱ्यातील देवी पॉईंट, सनसेट पॉईंट या नयनरम्य दृश्याचे दर्शन केले.वनरक्षक ठवकर व सोळंके यांनी निसर्गा च्या सानिध्यात असणाऱ्या प्रत्येक झाडाविषयी, निसर्गातील वन्य प्राण्यांविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. ही सहल यशस्वी करण्यासाठी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदकुमारजी अग्रवाल व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
Home आपला विदर्भ अमरावती धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय व सामाजिक...
















