चांदुर रेल्वे / चांदुर रेल्वे पासून सात किलोमीटर अंतरावर चांदूर रेल्वे ते अमरावती रोड वरील बासलापूर गावा जवळ ता 11 रविवारी रोजी ट्रक व कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये कार चालक अमित गजाननराव पांडे वय 45 वर्ष रा अमरावती यांचा मृत्यू झाला,
मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू कार चालक अमित गजाननराव पांडे, वय 45 वर्ष हे आपल्या चारचाकी(कार ) वाहन क्र MH 04 EX 6594 ने चांदुर रेल्वे ते अमरावतीच्या दिशेने जात होते,यावेळी विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र MH BX 9498 मध्ये समोरासमोर धडक झाली असून यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला,घटनास्थळावर पोलीस पोचल्यानंतर घटनास्थळावर जाम झालेली वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांना जेसीपी च्या मदतीने अपघातात चकना चूर झालेल्या कारला रस्त्याच्या बाजूने हलवण्यात आले,तर घटनास्थळी पोलिसांना कारमधून मृत्यूचे शव काढण्यासाठी नागरिकांनी मदत केली,यावेळी मृत्यू का चे शव पोस्टमार्टम करिता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे अमलदार,जगदीश राठोड,अतुल शिरसाट हे करत आहे,















