चांदुर रेल्वे / ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला,
याच्या सहभागी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी म्हणून 24 ऑगस्ट या घटनेचे निषेधार्थ स्थानिक स्तरावर महाविकास आघाडी तर्फे 24 ऑगस्टला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तोंडावर काळी फीती,डोक्यावर काळी पट्टी तर हातात काळे झेंडे घेऊन मूकनिषेध नोंदविण्यात आला,
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल होले, शहर अध्यक्ष निवास सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ,सुमेध सरदार, प्रफुल कोकाटे,संदीप शेंडे, वर्षाताई देशमुख,नीलिमा शर्मा,बंटी माकोडे,रुपेश पुडके,शिवसेना उ भा ठा गटाचे सातेफळ येथील संजय चौधरी, गजु यादव, स्वप्निल मानकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, विनोद काळमेघ,डॉ सतीश देशमुख,अमोल दुधाट, डोंगरे बाप्पू, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, तर देविदास राऊत, सतीश चौधरी, बंडू भैसे लक्ष्मण दरेकर, अनिल फरकाडे, अजय होटे,अवी खुणे, सागर दुर्योधन,संजय कोल्हे,भारत कर्से,पंकज मेश्राम, आकाश इमले, भूषण नाचवणकर, अशा असंख्य कार्यकर्ते या मूक मोर्चा मध्ये आपला सहभाग नोंदविला,