श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी धामणगाव रेल्वे येथे जागतिक फार्मसी दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला

0
64
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धामणगाव रेल्वे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एल बकाल व संस्थे चे अध्यक्ष श्री सुनील काळे सर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पवन अग्रवाल केमिस्ट अँड ड्रग असोसिएशन चे अध्यक्ष धामणगाव रेल्वे, आणि स्थानिक समुदायात मेडिकल चे फार्मासिस्ट अमित येंडे आशीर्वाद मेडिकल, राजश्री पालीवाल जैन मेडिकल, प्रफुल्ल सबले जिजाऊ मेडिकल , जाहीर अहमद सुजा मेडिकल यांची प्रमुख पाहुण्याची उपस्थिती होतीजागतिक फार्मसी दिवसानिमित्त महाविद्यालय मध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये इ- क्विज , रंगोली स्पर्धा,वादविवाद स्पर्धा, पोस्टर प्रेसेंटेशन आणि विविध कार्यक्रम व शैक्षणिक कार्यशाळा, सेमिनार, आणि जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबद्दल माहिती दिली जात आहे.

फार्मासिस्टच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी व्याख्याते आणि श्री पवन अग्रवाल तज्ञांचे यांची उपस्थिती होती. तसेच, स्थानिक समुदायात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी फार्मासिस्ट ची महत्त्वाची भूमिका दर्शविणारे प्रोजेक्ट्स सादर करण्यात आले. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक भविष्याबद्दल प्रेरणा दिली. या प्रोग्राम चे समन्वयक प्रोफेसर प्रशांत शेळके दिनेश कोरडे, जितेंद्र कुबडे, पूजा हटवार, काजल जुमडे, समीक्षा मोरे, काजल ठाकूर, मनोज ठाकरे, कांचन हिवे, व शिक्षक व शिक्षकेतर यांची उपस्थिती होती आणि कार्यक्रमाला लाभार्थी होते.

veer nayak

Google Ad