श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(वार्ताहर)

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे वतीने विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम प्राचार्य श्री सुनील जाधव. उस्मानाबाद तसेच सौ जाधव,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक बोंद्रे,श्री.सुहास आप्तूरकर, यांच्या हस्ते वसतिगृह परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे व मूर्तीचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ध्वज व ढोल ताशांचे विधिवत पूजन व हार अर्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य बॅनर मुलींचे वस्ती गृहावरून पुष्पवर्षावसह सोडण्यातआले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सुहास आप्तुरकर यांचे नेतृत्वात महाविद्यालयाच्या माऊली ढोल ताशा पथकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक आश्रम ट्रस्ट परिसर ते कृषी महाविद्यालयाचे इमारतीपर्यंत काढण्यात आली.यामध्ये शिवाजी राजे यांचे भूमिकेत कुणाल सेलोकर,राष्ट्रमाता जिजाऊ यांचं भूमिकेत कुमारी सानिका इपर,तर सईबाई चे भूमिकेत कुमारी गौरी खापरकर तसेच बाल शिवाजीचे भूमिकेत यज्ञेश अप्तूरकर सहभागी झाला होता.

यावेळी सर्व स्वयंसेवकांचे जयघोषाने महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. यावेळी श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे इमारतीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य बॅनर पुष्पवर्षावात सोडण्यात आले. त्यानंतर शिवजयंती मार्गदर्शन कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दीपक बोंद्रे,प्रमुख वक्ते म्हणून ग्रामगीताचार्य श्री निलेश मोहोकार, कावली , तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. कल्याणी जाधव,प्रा. वैष्णवी बिजने,प्रा.पवन शिवणकर, श्री. सुहास आप्तूरकर, प्रा.राजेश इंगोले,कुमारी चंचल ठाकरे विचार मंचावर उपस्थित होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्ट धातू मूर्तीचे व फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमात यावेळी कुमारी अनुश्री पुलकंठवार आणि कुमारी प्रतीक्षा बनसोड यांनी आपल्या भाषणांमधून शिवचरित्र विशद केले. यावेळी प्रमुख वक्ते श्री निलेश मोहोकर यांनी विविध उदाहरणासह शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास उपस्थितांना समजावून सांगितला. प्रत्येक युवकांनी शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावून घेऊन त्यांचे विचारांचे आचरण आपल्या कृतीमध्ये आणून सुदृढ समाजाचे निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन यावेळी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समीक्षा पोटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन वैभव राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नंदूशेठ चव्हाण,महाविद्यालयाचे सर्व व्यवस्थापन समिती पदाधिकारी, प्राचार्य डॉ.चंद्रकांत पाटील, श्री अमोल गंथडे, प्रमोद मारबदे, संगीता उंबरकर,माधुरी काकडे, महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad