श्री संत परमहंस महादेव बाबा जयंती महोत्सव उत्साहात सुरू.

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे….. श्री संत परमहंस महादेव बाबा जयंती महोत्सव प्रित्यर्थ अखंड हरिनाम श्रीमद् भागवत सप्ताह ग्रामगीता समन्वय आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी याचे निमित्ताने श्री क्षेत्र दाभाडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .सकाळी ग्रामसफाई ,श्रींचा अभिषेक, सामुदायिक ,ध्यान मार्गदर्शन ,रामधून ,भागवत प्रवचन ,ग्रामगीता पारायण विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम हरिपाठ सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सामुदायिक प्रार्थनेच्या मार्गदर्शनावरश्री ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात त्यांनी समाजामधील लहान मुलं हे संस्काराचे मुख्य केंद्र आहे .जर त्यांना लहानपणी चांगले संस्कार दिले तर ते आपल्या गावाचा आपल्या कुटुंबाचा आपल्या राष्ट्राचा आदर्श घेऊन समाजात चांगला नागरिक होईल .म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ओवी प्रमाणे या कोवळ्या कळ्या माजी लपले रवींद्र ,ज्ञानेश्वर, शिवाजी विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष या ओळीवर चिंतन करून सामुदायिक प्रार्थना म्हणजे आपल्या जीवनामध्ये स्वर्ग समसंसार होय त्यासाठी मानवाला विविध कला, गुण, व संस्काराची आवश्यकता आहे. जर आई-वडिलांनी आपल्या मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले तर मोठा झाल्यावर तो चांगला माणूस होईल हीच त्या आई वडिलांच्या जीवनाची खरी प्रार्थना आहे.

जसे लहानपणी झाडांना आपल्याला जसा आकार देऊ तोच तसा देता येतो परंतु झाड मोठे झाल्यानंतर त्याला आकार देणे शक्य नाही त्याचप्रमाणे माती ओली असताना कुंभार त्याला आकार देऊ शकतो परंतु मडके भाजल्यानंतर त्याला आकार देता येत नाही तसेच मानवी जीवनाचे आहे त्याला आकार हा लहानपणी बालवयात दिल्यानंतर ते संस्कार मरे पर्यंत कायम राहतात म्हणजेच हीच खरी कुटुंबाची प्रार्थना आहे .गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवून गावातील तरुण ,वृद्ध, महिला यांच्यासाठी आदर्श कार्य करणे म्हणजेच गावाची प्रार्थना होय असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले.आपल्या मार्गदर्शनात म्हणाले आई-वडिलांना संदेश दिला जर तुम्ही घरामध्ये गीता, रामायण, महाभारत ,ग्रामगीता, यासारखे ग्रंथ अध्ययन करून आपल्या मुलांना त्यामधील चांगल्या गोष्टी जर शिकवले तर समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,संत गाडगे महाराज, सिंधुताई सपकाळ ,बाबा आमटे, यांसारखे महापुरुष निर्माण होईल म्हणून सामुदायिक प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे जी जीवनाची बोध शाळा आहे. म्हणून आपण नित्य नियमाने सामुदायिक प्रार्थना करून लहान मुलांना सहभागी करून त्यांना शिस्त, शांती ,गांभीर्य आधि गुण शिकवल्याने आदर्श तरुण निर्माण होईल व गावाचे कल्याण होईल हिच गावाची खरी प्रार्थना आहे .अअसे प्रतिपादन आपल्या ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले. जास्तीत जास्त आई-वडिलांनी आपली मुलं संस्कार शिबिरात पाठवून आपल्या जीवनाचे कल्याण करावे हा संदेश त्यांनी दिला.

veer nayak

Google Ad