श्री मारोती देवस्थान ट्रस्ट दिपोरी येथे श्रीराम नवमी, हनुमान जयंती व श्री शिवमहापुराण  कथेचे आयोजन. उज्जैन येथील पंडित सुरज शर्मा यांच्या वाणीमधुन शिवमहापूराण.

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

येथून जवळ असलेल्या श्री क्षेत्र मारोती देवस्थान ट्रस्ट दीपोरी येथे श्री राम जन्मोत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या अभ्यासपूर्ण व सुमधुर वाणीने उज्जैन मध्य प्रदेश येथील सुप्रसिद्ध कथा वाचक पंडित सुरज शर्मा यांचे श्री शिव महापुराण आयोजित करण्यात आलेले आहे.

दिनांक १७ एप्रिल एप्रिल ला सकाळी १० वाजता पासून श्रीराम जन्मोत्सव व प्रसाद वितरण तसेच गुरुवार १८ एप्रिल ला दिपोरी या गावात सकाळी १०  कलश यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे दुपारी २ वाजता पंडित सुरज शर्मा श्री शिवमहापुराण कथेला प्रारंभ करतील दिनांक १९ व २० एप्रिल ला श्री शिवमहापुराण कथा व २१ एप्रिल ला शिवपार्वती विवाह कथा २२ एप्रिल ला पार्थेश्वर महापूजा व अभिषेक दुपारी २ वाजता कथेची समाप्ती व रुद्राक्ष वितरण करण्यात येईल याच दिवशी रात्री जय बजरंग भजन मंडळ दिपोरि द्वारे जागृती भजन चे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे २३ एप्रिल ला पहाटे ५ वाजता महाभिषेक व सामूहिक आरती व सकाळी १० वाजता गोपाळ काल्याचे कीर्तन आणि दुपारी १२ नंतर महाप्रसादाचे भव्य आयोजन सुद्धा करण्यात आलेली असून सायंकाळी ६ वाजता श्रीं च्या पालखीची शोभायात्रा गावातून परिक्रमा करेल या  धार्मिक कार्यक्रमांमध्ये श्री शिवमहापुराण मध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन श्री मारोती देवस्थान ट्रस्ट दिपोरी येथील सर्व गावकरी मंडळी व महिला मंडळ यांनी केलेले आहे

veer nayak

Google Ad