धामणगाव रेल्वे,
श्री मारोती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, दिपोरी व सर्व गावकरी मंडळी तर्फे गुरुवार दिनांक २ एप्रिल ला श्री हनुमान जन्मोत्सव व रामकथेची सांगता आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे
दिपोरी येथील प्रख्यात श्री मारुती देवस्थान येथे गुरुवार दि. ०२ एप्रिलला पहाटे ५ वाजता सामुहिक पुजा सकाळी १०.०० वाजता गोपाल काल्याचे किर्तन ह.भ.प.श्री. राम कथाव्यास श्री गजानन वायकर महाराज अमरावती यांचे सुमधुरवाणीने होणार असून सकाळी ११.३० वाजता डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड-रोठे यांच्या नगराध्यक्ष धामणगाव रेल्वे यांच्या हस्ते रामकथेची सांगता व महाआरती होणार आहे तसेच दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत “महाप्रसाद”आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन श्री मारोती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, व सर्व गावकरी मंडळी, दिपोरी (रेल्वे) यांनी केले आहे















