श्रीगुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सम्पन्न

0
77
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे- 

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या तत्व प्रणालीनुसार व राष्ट्रधर्म प्रचार समिती दासटेकडी सलग्नित तालुका श्रीगुरुदेव सेवा समिती तर्फे स्व.शकुंतलादेवी राधेशामजी लोया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित *श्यामली* विशेष शिबीरा चे आयोजन 2 मे पासुन करण्यात आले होते सुसंस्कार शिबिरामध्ये नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,वर्धा, गोंदिया, यवतमाळ ,वाशिम,अमरावती अशा विविध जिल्ह्यातून दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांना आदर्श दिनचर्या विविध खेळ मल्लखांब, लाठीकाठी ,दांडपट्टा ,बौद्धिक, थोरांचे चरित्र ,राष्ट्रप्रेम असे विविध प्रशिक्षण या शिबिरामधून दिल्या गेले 

या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाल कीर्तनकार कुमारी कृष्णप्रियाजी या ९ वर्षाच्या मुलीने कीर्तनातून सुसंस्काराचे धडे देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली त्याचप्रमाणे या विशेष शिबिरामध्ये श्रीगुरुदेव सेविका *श्यामली* समर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते सकाळ पासून संपूर्ण दिवस *श्यामली* या नावाने चांगला करण्यात आला त्यामध्ये राम नाम लेखन कार्यशाळा घेण्यात आली प्रशिक्षिका सौ राधाताई भूत ,गौरी भूत व राधेश भूत यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राम नाम लेखन शाळा सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत पार पडली   

सोबतच जादूचे प्रयोग व्ही एम राठौड़ सर यानी दाखविले,आरोग्य मार्गदर्शन शिबिर व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामुदायिक प्रार्थना मधून *श्यामली* ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली 

श्री मनोजजी भिष्णुरकर निर्माता यांचा तुकडयादास चित्रपट दाखवण्यात आला।    

मातृदिना निमित्य वणी येथील ग्रामगिताचार्य विजयाताई दहेकर यांच्या उपस्थितित विद्यार्थ्यांच्या हस्ते मातृशक्तिनचे पूजन करून मातृभक्ति गितानी साजरा करण्यात आला त्या क्षणि सगळ्यांचे डोळे पानवले होते।          

शिबिरामधिल संपूर्ण विद्यार्थ्यांनचे धामणगाव नगरी तून रामधून प्रभात फेरीचे आयोजन श्रीमती हिरीबाई नंदलालजी लोया स्मृति भवन,लोया वाड़ी ते गांधी चौक पर्यन्त करण्यात आले होते त्यामध्ये विविध सामाजिक संघटने तर्फे ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना ज्यूस,नाश्ता व खाऊचा वाटप करण्यात आला व या प्रभात फेरीत ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. महेशजी साबळे यानी रुग्नवाहिका उपलब्ध करून दिली त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना ने आण करण्या साठी स्कूल ऑफ स्कॉलर च्या प्राध्यापिका के.साई.नीरजा यानी बस ची व्यवस्था केली तसेच राधेश भूत ने जुन्या काळातील दम्मन (बैलगाड़ी) तुन व.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमे ची शोभायात्रा काढली हे विशेष आकर्षण ठरले।

यावेळी गांधी चौक येथे विद्यार्थ्यांनी लाठीकाठी,लेझीम,मनोरे व फुगडी प्रात्यक्षिक सादर केले    

या शिबिराला मा.आचार्य वेरुलकर गुरुजी राष्ट्रधर्म प्रचार समिति दासटेकडी गुरुकुंज मोझरी व मा.श्रीलक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी अ. भा.श्रीगुरुदेव सेवा मंडल गुरुकुंज मोझरी व अनेक गणमान्य व्यक्तिनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन देऊन आशीर्वाद दिले।

 या शिबिराला श्री चंद्रकांतजी (लप्पी भय्या) जाजोदिया ,हाथ फाउंडेशन ,देवकरणजी रॉय चे व गावकरी मण्डलीचे सुद्धा सहयोग प्राप्त झाले

आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यानी शिबिराचा कालावधी वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली।

समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष धामणगाव तालुका सेवाअधिकारी श्री रमेश दादा ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून श्री जनार्दनपंत बोथे सरचिटणीस गुरुकुंज आश्रम ,श्री डॉ. सतीशजी तराळ जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलीपजी काळे अध्यासन केंद्रप्रमुख संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती श्री विट्ठालदादा काठोळे शिबिर प्रमुख श्री गोपालजी भूत सामाजिक कार्यकर्ते शिबिराचे मुख्य सल्लागार ,श्री गोपालजी कडू , उपस्थित होते दीप प्रज्वलन करून संकल्पगिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली।

विद्यार्थ्यांनी दीपासन मराठी श्लोक हिंदी श्लोक भगवद्गीतेचा बारावा अध्याय या बौद्धिक विषयाअंतर्गत सादरीकरण केले विविध भजन यावेळी गाऊन विद्यार्थ्यांनी संगीतामध्ये तबलावादन सादर केला लाठीकाठी लेझी मल्लखांब भाषणे मी श्याम बोलतो हा एक पात्री प्रयोग नैतिक इंगळे,देवळी या विद्यार्थ्याने सादर केला शिवराज भेंडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गांऊन लोकांची मनी जिंकली।   

सर्व सेवाभावी शिक्षकांचा श्याम गौरी कलेक्शन तर्फे पाहुणे जनार्दनपंत बोथे गुरुजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे आदर्श विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला   

श्री जनार्दनपंत बोथे गुरुजी सरचिटणीस अ. भा.श्रीगुरुदेव सेवा मंडल गुरुकुंज आश्रम आपल्या भाषणात म्हणाले हा उपक्रम म्हणजे राष्ट्रसंतांचे कार्य विश्वस्तरावर नेण्याचा मोलाचा वाटा संस्कार शिबिराचा आहे म्हणून असे संस्कार शिबिर काळाची गरज आहे तर सचिनजी तराळ म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज सारखे तरुण तयार होऊन आज नव पिढी संस्कारक्षम होण्याची गरज आहे तर श्री दिलीपजी काळे म्हणाले संस्कार शिबिरात आदर्श नागरिक तयार होणारी कार्यशाळा असून राष्ट्रसंत व कर्मयोगी गाडगेबाबा यांचे कार्य विश्वस्तरावर संस्कार शिबिराच्या माध्यमातून होत आहे तर सामाजिक कार्यकर्ते,शिबिराचे मुख्य सल्लागार गोपालजी भूत म्हणाले की हे संस्कार शिबिर मानवी कल्याणाचा केंद्रबिंदू आहे त्यासाठी आम्ही तन-मन-धनाने संपूर्णपणे सहकार्य करण्यास तत्पर आहोत ज्याने नवपिढी घडते हेच एक आदर्श कार्य आहे माझे सासरे स्व.राधेश्यामजी लोया यानी बांधलेले मंगल कार्यालय सुसंस्कार शिबिरा सारख्या कार्यक्रमा साठी उपयोगी पड़त आहे तर ते सार्थक झाले असे वाटते तर अध्यक्ष भाषणामध्ये रमेशदादा ठाकरे म्हणाले १५ वर्षा पूर्वी कावली येथून सुरू झालेल्या या शिबिराला आज वटवृक्षामध्ये निर्मिती झाली हा संस्कार म्हणजे आदर्श समाजाची जडणघडणीचा पाया आहे या कार्यक्रमांमध्ये सर्व सेवाभावी दानदाते यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री विठ्ठलदादा काठोळे शिबिर प्रमुख तर सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले तर आभार व्यवस्थापन रवी चौधरी यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षकांमध्ये शिक्षाक प्रमुख निलेश मोहकार हनुमंत ठाकरे प्रशांत टांगले सागर ठाकरे शुभम सगळे कृष्णा शेंडे प्रतीक ब्राम्हणकर सचिन धांदे शुभम जुनघरे ऋषभ झोटिंग समीर कळसकर विजय ठाकरे मंगेश वानखडे इत्यादी शिक्षकांनी सेवाभावी प्रशिक्षण या ठिकाणी दिले तर या शिबिराला संपूर्णपणे व्यवस्थापनाची जबाबदारी म्हणून विठ्ठलदादा काठोळे गोपालजी भूत रमेशदादा ठाकरे रविभाऊ चौधरी दीपकराव इंगळे अरुणराव गरड गोविंद कपिले गजानन भेंडे सुरेश ठाकरे संजय वर्मा गजानन उपरिकर संजय बोरकर अरुणराव ठाकरे प्रदीप गोपाळ रविभाऊ कडू यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचा शेवट राष्ट्र वंदना ने करण्यात आला.

veer nayak

Google Ad