शाळा व महाविद्यालय नवीन वसाहत असलेले, शास्त्री चौक ते भंडारी बगीचा हा अत्यंत वर्दळीचा मार्ग चाळणी झालेला असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे दैनंदिन लहान साहान अपघाताला कारणीभूत ठरत असून मोठे अपघात घडल्यास व एखाद्या नागरिकांचा जीव गेल्यास त्यानंतर प्रशासन जागं होईल का? या मार्गाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुका पूर्वी तात्कालीन व विद्यमान आमदार महोदयाच्या हस्ते करण्यात आले होते. शहरातील प्रमुख रोडचे सिमेंटीकरणासाठी ५० कोटी मंजूर होऊन कोठारी नगर ते गजानन महाराज मंदिर थोडेसे काम वगळता कोणतेही कामात प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. येत्या १५ दिवसात या रोडचे प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्यास रस्त्याच्या प्रत्येक खडयामध्ये बेशरम चे झाड लावून व रास्ता रोको आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धामणगाव तालुका व शहर च्या वतीने शिवसेना स्टाईलने केल्या जाईल. त्यास पूर्णपणे नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील. असे निवेदन देण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख नानाभाऊ देऊळकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले यावेळी माजी शहरप्रमुख गोपालभाऊ मोकुलकर, शहर संघटक अशोकभाऊ कुचेरिया, उपतालुकाप्रमुख दीपकभाऊ कुंमरे, उपशहर प्रमुख संतोषभाऊ गावंडे, विभाग प्रमुख रवी काटणकर, अतुल चौधरी, मनीषभाऊ गोपाळ, स्वप्निल कोंबे. आशिष गावंडे, सागर गुल्हाने, संदीप गोटाणे, मधुर पालीवाल, प्रतीक ढोमणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.