शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  धामणगाव रेल्वे 

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 आज दिनांक 1जुलै २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह धामणगाव रेल्वे येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूक नियोजना संदर्भात आढावा बैठक पार पडली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख श्री. *मनोजभाऊ कडू* तसेच तालुकाप्रमुख *नानाभाऊ देऊळकर* यांच्या नेतृत्वात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अमरावती जिल्हाप्रमुख मनोज भाऊ कडू यांनी धामणगाव तालुक्यातील महत्त्वाची पदाधिकाऱ्यांना  निवडणुका लक्षात ठेवून त्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि धामणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद वर भगवा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागा असे आदेश देण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला माजी शहरप्रमुख गोपालभाऊ मोकलकर, माजी उप तालुका प्रमुख सुरेंद्रभाऊ पंधरे, उप तालुका प्रमुख शरदभाऊ देवगीरकर, दीपकभाऊ कुंमरे, विभाग प्रमुख नंदूभाऊ डुकरे, धनंजय निस्ताने दिलीप बोमनोटे उपविभाग प्रमुख गजानन नेवारे, अनिल माळोदे, सतीश तिजारे, उमेशभाऊ इंगोले तसेच शिवसैनिक मनीषभाऊ गोपाळ, दिलीप महात्मे, स्वप्निल कोंबे, उमेश वाघाडे, सुशील कडू, रोशन कैकाडे, सचिन बळासे, प्रतीक ढोमणे, कृष्णा मेश्राम, पवन बागवाले, नितीन सरकटे, गिरधर सहारे, मंगेश मेश्राम आदी शिवसैनिक उपस्थित होते.

veer nayak

Google Ad