अमरावती(प्रतिनिधी)-मुंबई येथील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मार्च महिन्याची मासिक बैठक मुंबई ऐवजी अमरावती येथे घेण्याचे नियोजित असताना त्या बैठकीचे ठिकाण परस्पर बदलून चिखलदरा येथे ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बँकेचे स्वीकृत संचालक असणारे व राज्यातील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या बँकेच्या १९ संचालक मंडळातील शिवसेना प्रणित ९ संचालकांना डावलून सदर मासिक बैठक घेतल्याने शिवसेना प्रणित संचालकांनी ही बैठक घेण्यावर आक्षेप घेत स्वीकृत संचालक ॲड गुणरत्न सदावर्ते यांना जाब विचारला असताना त्यांनी या संचालकांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याने सदर संचालक यांनी सदर घटनेची माहिती अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांना दिली व ते लगेच जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्तेसह याठिकाणी हजर झाले.
या बँकेचे स्वीकृत सदस्य ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या दबावाखाली सदर बैठक घेण्यात आली असे आढळून आल्याने व शिवसेनेचे ९ संचालक यांना अपमानास्पद वागणूक देत त्यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आक्रमक भूमिका घेत सदर बँकेचे एमडी श्री भोसले याला जाब विचारला विचारला.तसेच शिवसेनेच्या महिला बँक संचालकावर ॲड.गुणरत्न सदावर्ते व त्यांचे संचालक सहकारी धावून गेल्याने चर्चेचे रूपांतर वादात झाले.
“शिंदे साहेब जिंदाबाद,एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देत शिवसेनेच्या ९ संचालकांची बँकेचे स्वीकृत संचालक ॲड.गुणरत्न सदावर्ते व त्यांचे संचालक यांना शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी जाहीर माफी मागायला लावली व पुन्हा अशी चूक होणार नाही व शिवसेनेचे ९ संचालक यांना सन्मानाची वागणूक देऊ,असे ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी आश्वासन दिले व “तुम्ही एक म्हणाल तर आम्ही एक म्हणू आणि तुम्ही दोन म्हणाल तर आम्ही दोन म्हणू ” असे नमती भूमिका घेत चिखलदरा येथून आपल्या संचालक सोबत पळ काढला.
अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून खरा शिवसैनिक कशाला म्हणतात हे आम्हाला आज पहायला मिळाले असे प्रतिपादन याप्रसंगी उपस्थित मुंबई येथील संचालक यांनी केले व त्यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख सुनिल केने,प्रितेश अवघड,तालुका प्रमुख निलेश मालवीय,निवृत्ती बारद्धे,रघुनाथ लोखंडे,राजु गिरी, सुभाष घुटे,गणेश गावंडे,सचिन कोरडे,वेदांत देशमुख,राहुल भुबर, हेमंत उमाळे तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.