बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अभिवादन. शहरातील शिवसैनिक पदाधिकारीनि केले आयोजन.

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे / हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती व जन्मशताब्दी निमित्त शिवसेना कार्यकर्ते व महिला आघाडीच्या वतीने त्यांना ता 23 शुक्रवार रोजी शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात अभिवादन करण्यात आले.

शिवसेना शहर प्रमुख गोलू यादव यांच्या नेतृत्वात शिवसैनिक कार्यकर्ते व महिला आघाडी च्या वतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे विधीवत पूजा करण्यात आली,यावेळी स्मारकाला फुलाने सजवण्यात आले होते तर स्मारकाच्या आजूबाजूला दिव्यांचा प्रकाश करण्यात आला,तर फटाक्याची आतिबाजी करत बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला,यावेळी बच्चू वानरे(न प उपाध्यक्ष) बंडू यादव (विधानसभा संघटक) राजेश पांडे (शिवसेना जिल्हा उपप्रमुख) जयश्री कातकिडे (जिल्हा प्रमुख महिला आघाडी)वर्षा मालखेडे,अलका कलावटे,ममता युके,टीना ठाकरे गजानन यादव,सुभाष महाराज,प्रमोद नागमोते,गोपी यादव,कैलास गावंडे,संदीप हजारे,श्रीकांत गोसावी,आकाश चौधरी,विक्रम नांदुरकर,विक्रम डोंगरे,सुरज मोहिते,समीर राऊत,अक्षम शेंडे,अक्षय सुरुसे, प्रजीत दिडके,सचिन बागडे, सह अनेक शिवसैनिक सह शहरातील अनेक नागरिक यावेळी हजर होते,

veer nayak

Google Ad