शिवजयंती विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे गुंजी येथे आयोजन

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

गुंजी :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुंजी येथे शिवजयंती विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत जि.प. शाळेजवळ, गुंजी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात अक्षय राऊत हे विशेष वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते शिवचरित्र, स्वराज्य व प्रेरणादायी विचारांवर आधारित व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. विरेंद्रभाऊ जगताप (माजी आमदार) तसेच मा. श्री. अमरभाऊ काळे (खासदार) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

शिवजयंतीनिमित्त आयोजित या प्रेरणादायी कार्यक्रमास शिवप्रेमी, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समिती गुंजी व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad