धामणगाव रेल्वे :–अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या तत्वप्रणाली नुसार व श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती सलग्नित तालुका श्रीगुरुदेव सेवा समिती तर्फे स्व. शकुंतलादेवी राधेश्यामजी लोया यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी *’ श्यामली’* शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले।
आजचे सानसान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील गावाचा देशाचा पांगफेडतील उत्तम उत्तम गुणांनी* या ग्रामगीतेतील ओवी प्रमाणे संस्कार ही काळाची गरज म्हणून श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाला कार्यक्रम अध्यक्ष श्री जनार्दनपंत बोथे संरचिटनीस अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडल गुरुकुंज मोझरी उद्घाटक प.शंकरप्रसादजी अग्निहोत्री,अध्यक्ष जय महाकाली शिक्षण संस्था,वर्धा प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, महाराजा ऑफ नागपुर ,श्री सचिनजी राजारामबापू घोँग़टे सचिव श्री गाडगे महाराज मिशन ,मुंबई ,मां. आ. प्रतापजी अड़सड आमदार धामनगांव मतदार संघ ,श्री गोपालजी कङू प्रकाशन विभाग प्रमुख गुरुकुंज मोझरी, डॉ.संजयजी आदमने,वर्धा अध्यक्ष पद्मश्री फाउंडेशन,नागपुर ,श्री विठ्ठल दादा काठोळे वेदांताचार्य शिबीर प्रमुख ,श्री रमेशजी ठाकरे कावली ,तालुका सर्वाधिकारी ,श्री गोपालजी पु. भूत मुख्यसंयोजक श्रीगुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबीर धामनगांव रेल्वे व अन्नदान समिती सदस्य गुरुकुंज मोझरी व सौ राधाताई गोपालजी भूत समाज सेविका,डॉ.किरणताई खडसे,साक्षी कत्थक नृत्य अकादमी च्यारिटेबल ट्रस्ट वर्धा मंचावर उपस्थित होते.
शिबीराच्या उद्घाटना पूर्वी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज, स्वर्गीय शकुंतलादेवी लोया यांच्या प्रतिमेचे पूजन करून संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली
धामनगांव शहरातुन प्रथमच IAS चि परीक्षा उत्तीर्ण केल्या बद्दल रजत श्रीरामजी पत्रे चा व श्रीराम पत्रें चा शॉल व श्रीफल,स्मृति चिन्ह देऊन समितिच्या वतीने सत्कार कारण्यात आला.
या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बौद्धिक तासीके अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता, थोरांचे चरित्र, आदर्श दिनचर्या, सामुदायिक प्रार्थना ,सामुदायिक ध्यान, प्राणायाम ,सूर्यनमस्कार लाठीकाठी भजन, संगीत मलखांब , दाडंपट्टा अशा विविध विषय शिकविले जाणार आहे या शिबिराला जिल्ह्यामधून 200 विद्यार्थी उपस्थित झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणातून संस्कार ही काळाची गरज आहे आदर्श माता पिता असेल तर कुटुंब आदर्श होते हा देश ऋषीमुनींचा आहे साधुसंतांचा आहे म्हणून त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून संस्कार अंगीकारणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले तर उद्घाटीय भाषणात प .शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून संस्कृतता चे श्लोकसांगत अर्थ समजाऊन सागीतले व सर्वांच्या अगोदर आई वडीलांची सेवा केली पाहिजे असे म्हणाले तर राजे मुधोजी महाराज भोसले यानी या शिबिरासारखे शिबिरं दरवर्षी होणे ही काळाची गरज आहे यानेच आपला देश व समाज सुधारेल असे संगीतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक रावजी इंगळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत टांगले शिक्षक प्रमुख यांनी तर आभार प्रदर्शन गोविंद कपिले सर यांनी केले या शिबिऱ्याच्या व्यवस्थापनासाठी विट्ठालदादा काठोले, गोपाल भूत ,रवी चौधरी रमेश दादा ठाकरे ,अरुणराव गरड ,रवी कडू ,दीपक इंगळे, गजानन भेंडे ,गोविंद कपिले संजय वर्मा ,गजानन उपरीकर सुरेशराव ठाकरे, प्रदीप गोपाळ अरुण ठाकरे इत्यादी मंडळी व्यवस्थापन करीत असून शिबिराचा महत्त्वाचा शिक्षक प्रशिक्षक वर्गामध्ये मुख्य शिक्षक म्हणून प्रशांत टांगले ,उपशिक्षक ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे , उपशिक्षक ग्रामगीताचार्य निलेश मोहकार,सागर ठाकरे,कृष्णा शेंडे ,शुभम सगळे , चेतन बोरकर ,सचिन मुन,प्रतीक ब्राह्मणकर, शुभंम जुनघरे शुभम इंगले,सचिन धान्दे इत्यादी प्रशिक्षक शिक्षक मेहनत घेत आहे.पालक वर्ग सुद्धा मोठ्या संख्याने हजर होते।