शलाका विद्यामंदिर सायत, येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा..

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होतो, त्या अनुषंगाने सायत येथील शलाका विद्यामंदिर या इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन साजरा करून त्यांच्या आठवणीत विद्यालयातील पटांगणा त विविध खेळाचे आयोजन करण्यात आले.

त्यात खो-खो,कबड्डी, शॉर्ट रनिंग, अशा विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. त्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. कार्यक्रमात शलाका विद्यामंदिरच्या प्राचार्या राखी मेश्राम यांनी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना सांगितले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अध्यक्ष नानासाहेब रौराळे, प्रतिभा वलिवकर सर्व शिक्षक शिक्षकांचे सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad