जिल्हा प्रतिनिधी :- पवन पाटणकर शिराळा
शिराळा :- नुकताच शिराळा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या कॅम्प चे उद्घाटन डॉ. जयस्वाल सर सर्जन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पारिसे सर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी मॅडम व नोडल अधिकारी डॉ. केचे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कॅम्पमध्ये ३ TL व १ NSV ऑपरेशन करण्यात आले असून सर्व लाभार्थ्यांचे आरोग्य चांगले आहे. त्यामुळे याप्रसंगी उपस्थित लाभार्थी शास्त्रक्रिया धारकांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता आयुष्यमान आरोग्य मंदिर शिराळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे व डॉ. श्रवण कडू यांनी योग्य मार्गदर्शन केले.
व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा येथील आरोग्य सहाय्यक अर्डक, प्रभारी आरोग्य सहाय्यक इंगळे, आरोग्य सहाय्यायिका खऊळ मॅडम, आरोग्य सहाय्यायिका बोरकर मॅडम, औषध निर्माण अधिकारी रेवतकर मॅडम, गटप्रवर्तिका धनोकार मॅडम, सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन, पाटील सर, आशा स्वयंसेविका, परिचय वृंद, वाहन चालक राजूभाऊ झाकर्डे सर्वांनी सहकार्य करून मोलाचे योगदान दिले.















