धामणगाव रेल्वे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, मीसा बंदी (आणीबाणी) चे कार्यकर्ते, जनसंघाचे माजी नगरसेवक, अनेक वर्षापर्यंत तत्कालीन जनसंघाची शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणारे जुन्या काळातील कार्यकर्ते, भरत व्यास यांचे वडील शिवकिसन व्यास यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे मागे एक मुलगा एक विवाहित मुंबई निवासी मुलगी सौ.शोभा थानवी,यश व निधी हे नातू आणि नातवंड तसेच आप्तपरिवार आहे
त्यांची अंतिम यात्रा आज रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता अमर शहीद भगतसिंग चौक,श्री रामदेव बाबा मंदिर (धामणगाव रेल्वे) जवळील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल.















