स्व.श्रीमती बसंतीबाई ठाकूरदासजी रामावत स्मृतिप्रीत्यर्थ माध्यमिक कन्या विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर 

0
32
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

           कृषक सुधार मंडळ, तळेगाव दशासर द्वारा संचलीत माध्यमिक कन्या विद्यालय येथे दिनांक 4 ऑगस्ट सोमवारला स्व बसंतीबाई ठाकूरदासजी रामावत स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबिर माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्रभाऊ रामावत यांनी आयोजित केले.उद्घाटक म्हणून रेखाताई धोंडगे तर प्रमुख उपस्थिती जयाताई रामावत,नरेंद्रभाऊ रामावत,कृषक सुधार मंडळ चे सचिव आनंद देशमुख,पत्रकार मिलिंद कुलकर्णी,नीलेश रामगावकर, पॅथोलॉजीस्ट चेतन राऊत आणि त्यांची टीम उपस्थित होते.

     उद्घाटक रेखा धोंडगे यांनी आपल्या भाषणात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात AI आणि ChatGPT चे महत्त्व समजावून सांगितले.आयोजक नरेंद्रभाऊ रामावत यांनी रक्तगट तपासणी चे महत्व विषद केले. शिबिरामध्ये विद्यालयाच्या एकूण184 विद्यार्थिनीचे आणि कै नानासाहेब देशमुख मागासवर्गीय वसतिगृह तळेगावच्या 20 विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासले गेले.

मुख्याध्यापिका सौ मंजुषा देशमुख यांनी रक्तगट तपासणी शिबिर आयोजनाबाबत आयोजक तथा उपस्थितांचे आभार मानले.

शिबिराचे यशस्वी आयोजनाकरिता पोमेश थोरात,प्रतिभा मरसकोल्हे,माधुरी पांडे,सुप्रिया थोरात ,विरुळकर , कऱ्हाडकर, देशमुख, लक्ष्मण पोटे,गजानन कावळे , भागडकर यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad