धामणगाव
श्री दत्ता जी मेघे बालकल्याण शैक्षणिक संस्था संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स तर्फे चांदूर येथील रहिवाशांसाठी भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रांजली पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका के साई निरजा अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी रश्मी जोशी आणि प्रिया चौधरी प्रामुख्याने परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका पूजा भैसे व गणित शिक्षिका दीपाली खरे यांनी केले. या कार्यक्रमात अनेक स्पर्धांनी भाग घेऊन आपले कौशल्य दाखवले. या नृत्य स्पर्धेत आकर्षक व सुंदर नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. मुलांच्या सुप्त गुण व कला कौशल्याचा विकास करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, नृत्य शिक्षक सचिन उईके व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.