स्कूल ऑफ स्कॉलर्स ( कब्स )येथे वर्ल्ड इमोजी डे सेलिब्रेशन…

0
44
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे:-

मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे वर्ल्ड इमोजि डे मोठया उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. प्री प्रायमरी हेड शबाना खान मॅडम यांनी प्रत्येक इमोजि विषयी माहिती दिली तसेच वेगवगळ्या अर्थाने वेगवेगळ्या भावना व्यक्तं करण्यासाठी इमोजि वापरल्या जातात व चेहऱ्याव रील हावभाव उत्तमरीत्या दाखविण्यासाठी आपण इमोजी चा वापर करतो याविषयी माहिती दिली. प्रणिता मॅडम यांनी जागतिक इमोजी डे ची स्थापना व कोणत्या देशात सर्व प्रथम साजरा करण्यात आला या विषयी माहिती दिली. विद्यार्थांचे वेगवेगळ्या इमोजी मधे फोटो काढण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय के साई नीरजा मॅडम आणि प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, आश्विनी नांदणे यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad