सावनेर तालुक्यात पोषण महोत्सव जल्लोषात. ग्रामपातळीवर जनजागृती; पौष्टिक आहार प्रात्यक्षिके ठरली आकर्षण.

0
52
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नागपूर :

सावनेर तालुक्यातील केलवद येथे पोषण महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने केलवद, हट्टीसरा, बिडगाव, सावली मोहतकर अशा गावांमध्ये संपूर्ण सप्टेंबर (दि. १ ते ३० सप्टेंबर २०२५) महिनाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अदानी फाउंडेशन आणि AWL बिझनेस यांच्या फॉर्च्युन सुपोषण प्रकल्पातर्फे, आयसीडीएस विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आरोग्य शिबीर घेण्यात आले असून त्यामध्ये १५ बालकांचा समावेश होता. यामध्ये SAM, MAM आणि निरोगी बालकांचा समावेश करण्यात आला होता.

कार्यक्रमाला सरपंच गीतांजली वानखेडे, ग्रामसेवक मट्टामी सर, सदस्य रीता भगत, सारिका चिचखेडे, आयसीडीएस सुपरवायझर, महिला व बालकल्याण विभागातील लीना बोरीकर तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर उपस्थित होते.

सुपोषण संगिनी सौ. कविता पाटील, सौ. पूनम भोयर, सौ. शुभांगी खडसे यांनी पौष्टिक आहाराचे प्रात्यक्षिक सादर केले. सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून स्वस्त व आरोग्यवर्धक पाककृती करून दाखवण्यात आल्या. महिलांना पोषण आहार, गर्भवती व स्तनदा माता, किशोरवयीन मुलींचा आहार, पहिल्या १,००० दिवसांचे महत्व, स्वच्छता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

महिला, किशोरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात दिसून आला. ग्रामीण भागात पोषण व आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी आणि सकारात्मक पाऊल ठरला.

veer nayak

Google Ad