तक्षशिला वाचनालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती संपन्न. स्थानिक तक्षशिला सार्वजनिक वाचनालयांमध्ये नुकतीच सावित्रीबाई फुलेजयंती साजरी करण्यात आली.

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळाचे सेवा अधिकारी रमेश राव ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून दीपक इंगळे, लक्ष्मण मानकर, डॉ.शरद रंगारी, अतुल परतेकी, राजकुमार जांभळे, राजेंद्र ठाकरे, देविदास टाले, जांभुळकर साहेब कुमारी वैभवी ताथोड, ज्योती भातपिरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्रस्ताविक राजेंद्र ठाकरे यांनी केले.

यावेळी बोलताना दीपक इंगळे म्हणाले की प्रत्येक समाजात जागृत होणे काराची गरज आहे व सावित्रीबाई फुले ची विचार आत्मसात करणे हे सुद्धा काळाची गरज आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशराव ठाकरे यांनी ही संतांची भूमी आहे व भारतीय सुद्धा एक थोर महात्म्यांची भूमी आहे त्यांचे विचार आत्मसात करणे याच्या पिढीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपले विचार सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मांडले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार नितीन टाले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचारी आता परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad