सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका.

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षणापासुन आणि स्वातंत्र्य पासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी ठेवले जात होते. त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र सवित्रीबाईंना, जोतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने, स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले….ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत, बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे. आणि महिलांचे कल्याण आहे.सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या..

सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. त्यांच्या थोर सामाजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा होतो.

से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तिचित्र साकार करून विनम्र अभिवादन केले आहेत..

veer nayak

Google Ad