उद्धारली कोटी कुळे… भीमा तुझ्या जन्मामुळे….

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

!! ज्ञानयोगी !!

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधीलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात विश्वभूषण, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, प्रज्ञासूर्य, युगप्रवर्तक, महामानव, क्रांतीसुर्य, महानायक, बोधिसत्व, युगपुरुष, संविधान निर्माता, ज्ञानयोगी, भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी व बहुआयामी विद्वान यांचे नाव सर्वात वर आहे..

दिनांक – 14 एप्रिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळा निमित्त धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून कोटी कोटी शुभेच्छा दिल्या आहेत..

veer nayak

Google Ad