आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : गावाकडून पत्नीला भेटण्याकरिता आर्वी कडे येत असताना पत्नीला भेटण्याआधीच सावळापूर घाटातच गमावला जीव पत्नीला उपचार करुन घरी घेवुन जाण्याकरीता निघालेल्या तरुणाचा दुचाकीने अपघात झाला आणी यातच मृत्यु झाला. हि दुर्दैवी दुर्घटना लगतच्या सावळापुर घाटात रवीवारी (ता.९) दुपारी १२ वाजताचे सुमारास घडली.
गजानन मोरेश्र्वर उके (३८ वर्ष) असे मृतकाचे नाव असुन ते वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी येथील रहीवासी आहे. त्यांचे शेंदुर्जना खुर्द येथील ओमकार फत्तुजी शेंडे यांच्या मुली सोबत सुमारे चार वर्षा पुर्वी लग्न झाले. मात्र, आपत्य न झाल्यामुळे येथील स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रतिभा पावडे यांच्याकडे उपचार सुरू होते. रवीवारी (ता.९) दोघांचीही सोनोग्राफी करण्यात येणार होती. पत्नी वैष्णवी ही वडील ओमकार शेंडे यांचे सोबत शेदुर्जना खुर्द येथुन पावडे नर्सिंग होम मध्ये पोहचले. मात्र, एम एच ३२ ए डब्लु ४१५४ क्रमांकाच्या दुचाकीने निघालेला गजानन उके हा पोहचला नाही. सासरा ओमकार याने मोबाईल वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मात्र थोड्याच वेळात त्याचा अपघात झाल्याचे कळले. वर्धा मार्गावरील सावळापुर घाटात हा अपघात झाला असुन या अपघातात गजानन उके यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. याच मार्गाने आर्वी कडे येत असलेल्या मुख्याध्यापक पंतुसींग जाधव यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधुन ॲम्बुलन्स बोलावली. तसेच माहिती मिळताच पोलीस सुध्दा घटनास्थळी पोहचले. व उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करूण डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.
ठाणेदार सतिश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, संजय बाकडे, रोशन टेंबरे, खेमसींग कोहचडे हे पुढील तपास करीत आहे.