महाराष्ट्र ही संताची नगरी म्हणून ओळखल्या जाते यातच धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथे संत महादेव बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात भक्त सागर उसळला असल्याचे आज दिसून आले.
या जयंती महोत्सवाची सुरुवात 31 जानेवारीला झाली यामध्ये दैनंदिन कार्यक्रमांमध्ये ध्यान सामुदायिक प्रार्थना रामधून या विषयावर मार्गदर्शन अखंड हरिनाम श्रीमद् भागवत ग्रामगीता समन्वय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी अशा विविध कार्यक्रमांमध्ये गेल्या सात दिवसापासून रेलचेल होती या महोत्सवाची सांगता स्त्रीच्या पालखीने शोभायात्रा काढून सांगता झाली.
संपूर्ण दाभाडा नगरी हे महादेव बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमले या पालखी शोभायात्रेमध्ये धामणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक सेवा मंडळ भजनी मंडळ अनेक वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ सहभागी झाले होते.
गोपाल काल्याचे कीर्तनाने त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली या महाप्रसाद घेण्यासाठी संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुक्यातील भक्त मंडळीच तर नव्हे तर या अमरावती यवतमाळ वर्धा आधी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भक्तसागर उचलला होता.
गेल्या अनेक वर्षापासून या गावांमध्ये महादेव बाबा यांची जयंती सर्व संत जयंती म्हणून साजरी करण्यात येते.
या जयंती महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमाची रेलचे रसातही दिवस असते व सोबतच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केल्या जाते.
दाभाडा नगरी ही शोभायात्रा निघण्याच्यापूर्वी संपूर्ण गावामध्ये रांगोळी तसेच सर्व संतांचे फोटो आपल्या घरासमोर नागरिकांनी ठेवले होते या गावाची एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या मुली बाहेरगावला दिल्या गेल्या आहेत त्या संपूर्ण मुली व त्यांचा परिवार या जयंती महोत्सवांमध्ये सहभागी होत असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरी पाहुणे जणू संपूर्ण गावांमध्ये दिवाळी साजरी केली जात असल्याचे दिसून येते. चाळीस हजाराच्या वर महाप्रसाद भक्तांनी घेतला असल्याचे या कमिटीच्या द्वारे सदर प्रतिनिधीला सांगण्यात आले.