गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांच्यासह नागरिकांचा उस्फूर्त सहभाग
धामणगाव रेल्वे,ता.१६:- यंदा तीर्थक्षेत्र आळंदीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरे होत आहे.दरम्यान येथील पंचायत समितीतर्फे माऊलींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.यात गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांच्यासह अधिकारी,कर्मचारी, नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. येत्या “गोकुळ अष्टमीला” अर्थातच १५ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती.यापार्श्वभूमीवर सन २०२५ हे वर्ष सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘महोत्सव’ म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केले होते.त्यानुसार भक्तिमय वातावरणात पालखी व दिंडी सोहळा पार पडला.
या दिंडी सोहळ्याला गटविकास अधिकारी योगेश वानखडे, विस्तार अधिकारी निलेश वाघ यांनी प्रत्यक्ष पालखी खांद्यावर घेऊन भाविकांचा आनंद द्विगुणित केला.या दिंडी सोहळ्याकरिता गावातील सर्व पुरुष व महिला भजनी मंडळ, बहुसंख्य महिला, पुरुष, शाळेचे विद्यार्थी, गावातील सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग,तरुण नवयुवक मंडळी यांची उपस्थिती होती.दरम्यान ग्रामपंचायत ढाकूलगावतर्फेही पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी गटविकास अधिकारी योगेश वानखडे,बालविकास प्रकल्प अधिकारी गायत्री चव्हाण,गजानन काळे,विस्तार अधिकारी अमोल गेडाम,प्रशांत मनवर गोपाल वानखडे,वरिष्ठ प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी,कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय गुल्हाने,गजानन सांगळे सहाय्यक लेखाधिकारी अमोल गोफने,प्रणव कापकर,कृषी विस्तार अधिकारी शुभम खंडेझोड,विस्तार अधिकारी सांखिकी सचिन मिसाळ,कनिष्ठ अभियंता प्रवीण आखरे,अभिजीत कल्ले,गजानन काळे,शालेय पोषण आहार अधीक्षक अरुण चव्हाण,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शशांक जारी, अजिंक्य खेर्डे,मनीष बनपट्टे,वरिष्ठ सहाय्यक प्रकाश महात्मे,दिनकर काष्टे,संजय चव्हाण, सचिन गायकी,दुर्योधन चव्हाण,अमोल कावरे,पंकज यादव,मंगेश राऊत,लखन चव्हाण,संतोष वानखडे,मोबीन खान,राहुल ठाकरे,संजय मते,सुरज बकाले,सौरभ डुबे,पुरुषोत्तम खराबे,विजय मोरे,राहुल गुल्हाने,सोनाली कडू,अश्विनी सुलताने, मीनल पाटील,सुशिला राठोड,ऋतुजा हुमणे तसेच प्रेमकुमार अंबुलकर,विशाल सुटे,रवींद्र देशमुख, बंडू वैरागडे राजू पांडे,हेमलता परमार,राजू पवार, संदीप गजभिये,मनीषा बोर्दे
अजय सरदार,अमित ढवळे,आशिष कळसकर,विवेक महागावकर,संदीप काळपांडे,स्नेहल सोनटक्के ,हितेश वाघाडे व आदी उपस्थित होते.
———