धामणगाव रेल्वे… समाजामध्ये लहान मुलांमध्ये वाढते मोबाईलचे प्रमाण ,विभक्त कुटुंब पद्धती, यामुळे मुलांवर पालकांचे दुर्लक्ष होत आहे. घरापासून मुलगा बाहेर गेल्यावर कुणासोबत राहतो काय खातो काय पितो याकडे पालक डोळे झाक करत आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये व्यसनाधीनता सर्वात जास्त पाहण्यास मिळत आहे . जुन्या काळामध्ये गुरुकुल पद्धतीची च्या शाळा होत्या आदर्श पद्धतीचे शिक्षण आज तरुणाला आवश्यक आहे. कारण लहानपणी जर बालमनावर चांगले संस्कार झाले नाही तर ते कधीच होत नाही. साने गुरुजी म्हणतात मुले म्हणजे देवाघरची फुले त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नये. तुकडोजी महाराज म्हणतात या कोवळ्या कळ्या माझी लोपले रवींद्र ,ज्ञानेश्वर, शिवाजी, विकसता प्रगतीला समाजी शेकडो महापुरुष या तरुणां मुलांमध्येच ज्ञानेश्वरांसारखे ज्ञानी, शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी ,भगतसिंग सारखेवीर निर्माण होऊ शकते त्यांना योग्य मार्गदर्शन व योग्य संस्काराची आवश्यकता आहे. हीच बाब ओळखून ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी श्री गुरुदेव संस्कार वर्गाच्या माध्यमातून तरुणांना संस्कृत करण्याचा विडा हाती घेतलेला आहे . संस्कार शिबिराच्या माध्यमातून व संस्कार वर्गातून सकाळी उठणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, योगा करणे, देवदर्शन करणे, मोठ्यांचा आदर करणे, आईवडिलांची सेवा करणे, आई-वडिलांना नमस्कार करणे, रामायण ,महाभारत ,ग्रामगीता, दासबोध, भगवद्गीता, यासारख्या ग्रंथातील छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून बालमनावर चांगले संस्कार करण्याचा कार्य हनुमंत ठाकरे करीत आहे सोबतच राष्ट्रीय एकात्मता ,राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव , नैतिक मूल्य,आई-वडिलांची सेवा ,व्यसनाधीनता ,थोर संत, थोर समाजसेवक ,थोर विचारवंत, यांच्या बोधकथा सांगून बालमनावर चांगले संस्कार घडावे यासाठी संस्कार वर्गातून विविध गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणल्या जात आहे. आपण सर्व एक आहोत कोणीही लहान नाही कोणीही मोठा नाही कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही सर्वांनी एकोप्याने राहावे सर्वांना मदत करावी , मानवसेवा ही सर्वात महत्त्वाची आहे .यासारख्या गोष्टी विद्यार्थ्यांना संस्कार वर्गाच्या माध्यमातून शिकविल्या जात आहे .
सोबतच विद्यार्थ्यांचा बौद्धिक ,शारीरिक ,मानसिक विकासाच्या दृष्टीने बौद्धिक खेळ घेतल्या जात आहे ,सुंदर शाळा कशी असावी शाळेमध्ये मुलं संस्कार शिकले पाहिजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट, लावणे हात धुणे ,गलिच्छ बोलू नये, मोठ्यांचा आदर करावा, चोरी करू नये ,लबाडी करू नये, यासारख्या अनेक गोष्टींवर प्रकाश संस्कार पूर्ण वर्गाच्या माध्यमातून बालमनावर करीत आहे .आजचा युवक हा व्यसनाधीन झालेला आहे लहान लहान मुलांना व्यसन लागलेली आहे व्यसनामुळे कोणती वाईट परिणाम होतात .याचे उदाहरण देऊन या समाजामध्ये लहान मुलांमधील व्यसनाधीनता बंद करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी सुद्धा मार्गदर्शन या संस्कार वर्गाच्या माध्यमातून दिल्या जात आहे. वीर शिवबा वस्तीगृहात रोज सकाळी व संध्याकाळी संस्कार वर्गाचे कार्य ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे करीत आहे आपण एक समाजाचा घटक आहोत त्यासाठी या समाजाची तरुण पिढी म्हणजे उद्याचे भारताचे भावी नागरिक आहे. तिला लहानपणीच जर व्यवस्थित आकार दिला तरच उद्याचाभारत उज्वल होईल ,राम राज्य निर्माण होईल हाच दृष्टिकोन समोर ठेवून संस्कार वर्ग च्या माध्यमातून अखंड संस्कार दान देण्याचे कार्य ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे करीत आहे.