प्रतिनिधी :- अमरावती
प्रसिद्ध ललित लेखक बबलू कराळे यांच्या “सांजवेळ” ललित संग्रहाला सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक 21 मार्च 2024 ला पी आर पोटे इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र जी पोटे, प्रमुख उपस्थिती मा.प्रवीण भाऊ पोटे, मा. पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई ), मा. श्रेयस पोटे,मा. सौ अनुराधाताई पोटे, प्राचार्य डॉ.डी टी इंगोले, मा. डॉ. सुखदेव ढाकणे, मा. डॉ. शोभा रोकडे (ज्येष्ठ साहित्यिका ) यांच्या उपस्थितीमध्ये बबलू कराळे लिखित सांजवेळ ललित संग्रहाला सन्मानपूर्वक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. बबलू कराळे यांचे एकूण सात पुस्तक प्रकाशित असून त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत विविध साहित्यिक तथा सामाजिक संस्थांकडून राज्य पुरस्कार मिळालेले आहे. त्यांचे लेखन प्रसिद्ध वृत्तपत्रांमधून दिवाळी अंकामधून मासिकांमधून नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहे. याकरिता त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विदर्भ साहित्य संघ शाखा दर्यापूरचे अध्यक्ष डॉक्टर सतीश तराळ, उपाध्यक्ष प्रा. सुनील लव्हाळे, गणेश साखरे, गजानन काकडे, गावचे कर्तव्यनिष्ठ सरपंच मा. नारायण रावजी बोरेकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भक्ते ताई, उपाध्यक्ष बोरेकर ताई, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख श्रीकृष्ण उघडे, मुख्याध्यापक कुमारी शीला सोळंके, आदर्श शिक्षिका कल्पना चौधरी, किरण साकरकार, बबीता पंडित, दिनकर राऊत सर,रतिराम मावस्कर सर, यांनी शुभेच्छा दिल्या.
Home आपला विदर्भ अमरावती सांजवेळ ललित संग्रहाला राज्यस्तरीय स्व: सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे पुरस्कार