आज मंगळवार दि.०१/१०/२०२४ रोजी विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे संभाजी ब्रिगेड ची बैठक पार पाडली. याप्रसंगी नियुक्त्या करण्यात आल्या.चांदुर रेल्वे तालुकाध्यक्षपदी अनुप अवघाते (पाटील) नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्षपदी वैभव ठाकरे. धामणगाव तालुका अध्यक्षपदी अजय हटवार यांची निवड करण्यात आली तसेच संभाजी ब्रिगेड चांदुर तालुका उपाध्यक्षपदी अभिजित देशमुख,धामणगाव तालुका उपाध्यक्षपदी सुयोग्य ठाकरे , नांदगाव उपाध्यक्षपदी ऋषिकेश बेलसरे व येवती शाखा अध्यक्षपदी अक्षय गावनर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनेक तरुणांनी संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश घेतला
यावेळी संभाजी ब्रिगेड ची कामगिरी , धोरण 100% राजकारण आणि 100% समाजकारण व शेतकऱ्यांच्या मालाला भाव व दारू मुक्त गाव ही भूमिका घेवून महापुरुषांच्या सन्मानासाठी लढत असलेली संघटना आहे असे मार्गदर्शन मनिष पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित जिल्हा सचिव अभिजित कणसे, जिल्हा प्रवक्ते हेमंत टाले,जिल्हा संघटक गणेश गाहूकर,चांदुर रेल्वे येथील प्रतिष्ठित नागरिक राजुभाऊ वडतकर,अभिजित देशमुख, तेजस जवळकार,संजय उगले,संकेत ठाकरे, सोजल ठाकरे, अभिषेक ठाकरे, नितीन मारबदे,गौरव उगले,अतुल कळंबे,साहिल अवघाते व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…