गेल्या पन्नास वर्षाच्या वर कालावधी लोटला तरी भोंगाळे परिवार आजही संत सावता महाराज पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.
कावली येथील देवराव भोंगाळे यांचा परिवार गेल्या 50 वर्षाच्या अगोदर पासून त्यांनी संत सावता महाराज पुण्यतिथी करण्याची प्रथा सुरू केली व आजही ते टिकवत आहे भोंगाडे परिवार त्यांच्या घरीच सावता महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करत आहे.
आज संत सावता महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव त्यांच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील वारकरी संप्रदायाचे भजन मंडळ यांनी गोपाळ काल्याचे किर्तन करून या महोत्सवाची सांगता केली.
या पुण्यतिथी महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून रमेश ठाकरे तर गावातील प्रमुख अतिथी नानाजी देशमुख,गणेश केळोदे, साहेबराव मानकर,छत्रपती हिवसे, नरेंद्रजी ठाकरे, विलासराव भोंगाडे, नानाजी वाट, अशोक तीतरे, दिगंबर हिवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत सावता महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर गोपाळकाराचे कीर्तन सर्व वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत करण्यात आले. उपस्थिती त्यांना यावेळी महाभोजनदेण्यात आले.
या पुण्यतिथी महोत्सवाला गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्वश्री देवराव भोंगाडे व परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.