यवतमाळ -: अनेक वर्षांपूर्वी वडगाव परिसरातील साईबाबा नगर मधील नागरिकांच्या घरगुती तथा सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्याच्या उद्देशाने साईबाबा नगर मध्ये असलेल्या खुल्या जागेमध्ये शासनाने आमदार निधीतून समाजभवनाची निर्मिती केली.काही वर्षे त्या समाज भावनांमध्ये चांगल्या प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते.मात्र मागील काही वर्षांपासून या समाजभावनाच्या देखभाल व दुरुस्ती कडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या खुल्या जागेत व समाजभावनामध्ये
साईबाबा नगर मधील ओपन स्पेस आणि समाजभवनाची अत्यंत दुरावस्था झाली असून यामध्ये आता जनावरे मोकाट कुत्रे यांचा सुळसुळाट असून यासह या ठिकाणी गंजोटी दारुड्यांचा अड्डा झाला असून या ठिकाणी दिवसेंदिवस गांजा पिणाऱ्यांची संख्या वाढली मद्यपीं ठिकाण झाले आहे. एवढेच नव्हे तर या परिसरात रात्रीच्या वेळी प्रेमीयुगूलांच्या बैठकां सुरु झाल्या असून याच कारणास्तव काही दिवसापूर्वीच दोन युवकांमध्ये हाणामारी सुद्धा झाली होती.यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून भविष्यामध्ये जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.करिता यासंदर्भात नगर परिषदेला संबंधित समाजभवनाचा ताबा घेऊन त्याची देखभाल दुरुस्ती करून नागरिकांच्या कार्यक्रमाकरिता उपलब्ध करुन द्यावे या उद्देशाने त्या समाजभवनाची दुरुस्ती व स्वच्छता करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे. या मागणीची प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने तात्काळ दखल घेऊन संबंधितावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.