भारतीय मानवाधिकार परिषद रजिस्टर्ड – सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या वतीने मीरा रोड, मुंबई येथील जी.सी.सी. क्लबमध्ये सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सचिन करडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पीस २०२६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार भारतीय मानवाधिकार परिषदेचे नॅशनल प्रेसिडेंट हाजी शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन सचिन करडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक शांतता, मानवाधिकार आणि समतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना सचिन करडे यांनी हा सन्मान समाजसेवेच्या कार्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत भविष्यातही सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.















