श्री दत्ताजी मेधे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स येथे दिनांक ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे:-

एस ओ एस कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंति उत्साहात साजरी.

श्री दत्ताजी मेधे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स येथे दिनांक ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. के जी २ ची विद्यार्थिनि कुमारी ओजस्वी खडसे सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत आली होती.

प्रि प्रायमरी हेड मा.शबाना खान मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.प्री प्रायमरी हेड मा.शबाना मॅडम आणि शिक्षिका वर्षा देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. प्रि.प्रायमरी हेड मा.शबानाखान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, ,राणी रावेकर, आकांशा महल्ले, प्राजक्ता दारूंडे, श्रद्धा राय, अश्विनी नांदने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

veer nayak

Google Ad