हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देशपांडे यांनी भूषवले. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमित कारमोरे व डॉ. अग्रवाल मॅडम यांनी स्वीकारले.
शासनाने राबविलेल्या HPV या लसीकरणाविषयी पालकांना सविस्तर माहिती डॉ. कारमोरे यांनी दिली. 14 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या लसीकरणाने गर्भाशयाचा कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होणार नाही, स्त्रियांचे आरोग्य सदृढ राहील, निरोगी राहील, असे सांगितले.
ही लस शासनाने ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थिनींना मोफत दिली जाणार आहे. खाजगी दवाखान्यात ही लस सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही, याकरिता ही मोहीम शासन राबवित असल्याचे डॉ. अमित कारमोरे यांनी पालकांना पटवून दिले. या लसीने कोणत्याही आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या ज्या समस्या होत्या त्या डॉक्टरांना विचारल्या. डॉक्टरांनी पालकांचे योग्य आरोग्य संबंधी अनेक उदाहरण देऊन समुपदेशन केले. पालकांच्या मनात या लसी विषयी असलेला गैरसमज डॉ. अमित कारमोरे यांनी समुपदेशनाने दूर केला.
या समुपदेशनातून आपल्या पाल्याचे आरोग्य निरोगी राहिले पाहिजे असे पालकांना समजले. व लसीकरणासाठी आम्ही घेऊन जाऊ असे आश्वासन दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता देशपांडे यांनीही पालकांना लसीकरणाचे महत्त्व सांगितले. व आपल्या फॅमिली डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा व त्यांच्या संमतीनेच लसीकरण करावे असे सांगितले. तसेच आदरणीय मुख्याध्यापिका यांनी पालकांशी संवाद साधला व लसीकरणाबाबत सकारात्मक माहिती सांगितली.

















