# रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृतीवर पथनाट्य # सार्वजनिक बांधकाम विभाग व नेक्स्टे इन्फ्रा कंपनी संयुक्त अभियान  

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे /

चांदूर रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभाग व नेक्स्टे इन्फ्रा कंपनीच्या वतीने शहरातील मुख्य चौकात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करत पथनाट्यातून वाहतूक नियम समजावून सांगण्यात आले तर सिग्नलचे पालन करा, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका असे आवाहन करण्यात आले.

शहरातील चौका चौकात सार्वजनिक बांधकाम विभाग व नेक्स्टे इन्फ्रा कंपनीच्या वतीने पथनाट्यातून वाहतूक नियमांची माहिती व जनजागृती देण्यात आली स्वं बाळासाहेब ठाकरे चौकात पथनाट्यातून सिंग्नलचे पालन करा, गाडी चालवितांना मोबाईलवर बोलू नका, ड्रिंक करून गाडी चालवू नका, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका,चुकीच्या जागेवर गाडी पार्क करू नका,गाडी चालविताना सीट बेल्ट लावा,मोटर सायकल चालवताना हेल्मेटचा वापर करा,रस्ता ओलांडताना डावीकडे व उजवीकडे पाहा व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे संदेश पथनाट्यतून शहरांतील नागरिकांना देण्यात रस्त्यावरून दुचाकी वाहनावर जात असलेल्या महिलेला व सुरज चौधरी युवकाला उपस्थित अधिकारी हस्ते हेल्मेट देण्यात आले.यावेळी उपविभागीय उपअभियंता मनीषा खरय्या,कनिष्ठ अभियंता प्रशांत गुडदे,नव्याने रुजू पोलिस निरीक्षक अजय अहीरकर वाहतूक शिपाई योगेश नेवारे संदेश भालेकर,वरिष्ठ लिपिक चव्हाण,नेक्स्टे इन्फ्रा कंपनी हरीश सिंग,महेश भंडागे,सुरेन्द गेडाम,अभिषेक सिंग,अंगम रमेश,प्रमोदकुमार,वृषभ राॅय व इतर सहकारी उपस्थित होते .

veer nayak

Google Ad